बीड -भाजपच्या कुशीतील वाढलेली मी खरीखुरी कार्यकर्ता आहे. भाजप, मुंडे साहेब यांना कधीही वेगळं करता येणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या बीड गेवराई येथे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होत्या. तसेच भाजपाचे सर्व प्रोटोकॉल मी पाळले आहेत. त्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या बातम्याचे त्यांनी खंडण केले. काही दिवसांपूर्वी त्यांना शिवसेना पक्षात येण्याची ऑफरही देण्यात आली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या सगळ्या नाराजी नाट्यावर पंकजा मुंडे यांनी खुलासा केला आहे.
नाराजी नाट्यावर पडदा - भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना यांना पक्षातून डावलले जात असल्याचा सुर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगावाल होता. तसेच विविध कायक्रमात पंकजा मुंडेच्या नाच्या घेषणा देण्यात आल्या होत्या. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची कानउघडनी सुद्धा केली होती. त्यावर आज पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण देत नाराजी नाट्यावर पडदा टाकला आहे.
काॅग्रेसमधून आयात केलेला भाजपचा उमेदवार - प्राध्यापक किरण पाटील हे मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. 14 ऑक्टोबरला किरण पाटील यांनी काँग्रेसला हात दाखवताना भाजपचे कमळ हातात धरले होते . राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात भाजपकडे तगडा उमेदवार नव्हता.