महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेमडेसिवीरच्या अंधाधुंद कारभाराच्या विरोधात भाजपा युवा मोर्चा रस्त्यावर - beed latest news

भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंट चाटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परळी शहरातील खाजगी कोवीड केअर सेंटर व मेडीकल स्टोअरला भेटी दिल्या. भेटी दरम्यान डॉक्टर व मेडीकल वाल्यांशी चर्चा केली. त्यावेळी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याबाबत काय परिस्थिती आहे याची माहिती घेतली

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार

By

Published : Apr 26, 2021, 7:00 PM IST

बीड-कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करते वेळेस रेमडेसिवीर इंजक्शनची डॉक्टराकडुन मागणी केली जात आहे. परिणामी रुग्ण व नातेवाईक रेमडेसिवीर मिळवण्यासाठी सैरावैरा भटकत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेल त्या किमतीत लोक घेताना दिसत आहेत. यामुळे रेमडेसिवीर काळाबाजार तेजीत आला असून वेळीच याला आवर घाला अन्यथा भाजपा युवा मोर्चा पंकजाताई मुंडे व डॉ खा प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कचेरीवर आंदोलन करू असा इशारा जिल्हाध्यक्ष निळकंट चाटे यांनी दिला आहे.

रेमेडेसिवीर विक्रीत सावळा गोंधळ

यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंट चाटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परळी शहरातील खाजगी कोवीड केअर सेंटर व मेडीकल स्टोअरला भेटी दिल्या. भेटी दरम्यान डॉक्टर व मेडीकल वाल्यांशी चर्चा केली. त्यावेळी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याबाबत काय परिस्थिती आहे, याची माहिती घेतली. प्रत्यक्षात कोविड सेंटरला किती कोरोना रुग्ण दाखल आहेत. त्यातील किती रुग्णांना रेमडेसिवीरची अवश्यकता आहे आणि मेडिकल डिस्ट्रिब्युटरर किती इंजेक्शन कोविड सेंटरला पुरवतो याबाबत माहिती घेतली. मेडिकल डिस्ट्रिबुटरने कोविड केअर सेंटरला दिलेल्या इंजेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसत असून रेमेडेसिवीर विक्रीत सावळा गोंधळ दिसूनयेत आहे. उपलब्ध इंजेक्शनचा तुटवडा दाखवून काळाबाजार तेजीत आणला जात असल्याचा गंभीर आरोप चाटे यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details