बीड - आतापर्यंत अनेक वाढदिवस साजरे केलेले तुम्ही बघितले असले. मात्र, जिल्ह्यातील आष्टी येथे झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. धनश्री पंतसंस्थेच्यावतीने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. तसेच याद्वारे वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संदेश देण्यात आला.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे... बीडमध्ये साजरा केला चक्क झाडांचा वाढदिवस - birthday celebration of tree
गेल्या ३ वर्षांपूर्वी आष्टी येथील धनश्री पंतसंस्थेने १ जुलैला वृक्ष लागवडीचा कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याद्वारे आतापर्यंत ३७५ झाडे लावण्यात आले. तसेच त्याचे संगोपन केले. तसेच त्यांनी लावलेल्या वडाच्या झाडाला आज १ वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
गेल्या ३ वर्षांपूर्वी आष्टी येथील धनश्री पंतसंस्थेने १ जुलैला वृक्ष लागवडीचा कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याद्वारे आतापर्यंत ३७५ झाडे लावण्यात आले. तसेच त्याचे संगोपन केले. तसेच त्यांनी लावलेल्या वडाच्या झाडाला आज १ वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच शहरातील खडकत रोड परिसरातील इतर झाडांना सजवण्यात आले. त्यांना फुगे बांधण्यात आले. तसेच परिसर स्वच्छ करण्यात आला. एवढेच नाहीतर झाडांसमोर रांगोळ्या देखील रेखाटण्यात आल्या. तसेच सर्व झाडांना औक्षण करण्यात आले. एवढेच नाहीतर माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास धस आणि पतसंस्थेचे अध्यक्ष रंगनाथ धोंडे यांच्या केक देखील कापण्यात आला. तसेच यंदा ९० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला.
धनश्री पतसंस्थेच्या या अनोख्या कार्यक्रमात गावातील नागरिकांनीही सहभाग घेतला. त्यामुळे या उपक्रमाची चांगली सुरुवात झाली असल्याचा आनंद धनश्री पतसंस्थेचे अध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी व्यक्त केला.