महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन - Bhumipujan Beed bus depot

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामाच्या भूमिपूजन खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. 5 कोटी 45 लाख रुपये खर्चाचे हे बसस्थानक तयार होणार आहे.

बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामाच्या भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण खासदार प्रितम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

By

Published : Sep 20, 2019, 10:46 AM IST

Updated : Sep 20, 2019, 11:09 AM IST

बीड - राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामाच्या भूमिपूजन खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. 5 कोटी 45 लाख रुपये खर्चाचे हे बसस्थानक तयार होणार आहे. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कामाची उजळणी उपस्थितांसमोर केली. याचबरोबर खा. मुंडे यांनी हीन पातळीवरच्या राजकारणाला जनता वैतागली आहे, अशा शब्दात विरोधकांचा समाचार घेतला.

हेही वाचा -बेस्ट वर्कर्स युनियन आणि कृती समितीने पुन्हा उगारले संपाचे हत्यार

वैद्यनाथ देवस्थानचा समावेश रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळाच्या यादीत केल्याबद्दल तसेच बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांचा यावेळी प्रवाशांनी सत्कार केला व आभार मानले. यावेळी आगारप्रमुख, भाजपचे पदाधिकारी, प्रवाशी आदी उपस्थित होते.

Last Updated : Sep 20, 2019, 11:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details