महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Development Works In Beed : बीड मधे शंभर कोटींच्या विकास कामांचे भूमिपुजन - उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोणाच्या सकटात विकासाची कामे करणे आवघड गेले. पण संकटाच्या काळात देखील आमच्या सरकारने आरोग्य विभागला निधी कमी पडू दिला नाही. येणाऱ्या काळात देखील बीडला निधीची कमतरता भासू देणार नाही, (Beed will not be short of funds) असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या जनतेला दिला. बीड मधे शंभर कोटींच्या विकास कामांचे भूमिपुजन आणि लोकार्पन झाले त्यावेळी ते बोलत होते.

Bhumipujan of development works worth Rs 100 crore
शंभर कोटींच्या विकास कामांचे भूमिपुजन

By

Published : Feb 8, 2022, 5:14 PM IST

बीड- शंभर कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपुजन व लोकार्पण आज ऑनलाइन पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ.अमरसिंह पंडित, आ.संजय दौंड, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे आदींची उपस्थिती होती. तर ऑनलाइन द्वारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री हसन मुश्रीफ आदींची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की, जनतेचा पैसा आहे , त्यामुळे कामाचा दर्जा संभाळून कामे करायची आहेत. याशिवाय सर्व सामान्य नागरीकांना उपचार सहज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वारंवार पाठपुरावा करत निधीचा आग्रह धरला. त्यामुळे बीडसाठी शंभर कोटीची कामे आघाडी सरकारने मंजूर केले आहेत.

राज्य सरकार मुळे रेल्वे नगर पर्यंत आली - मुंडे
कोविड च्य निर्बंध असल्याने दादांना या महत्त्वाच्या कार्यक्रमाला येता आलेले नाही. जिल्हा नियोजन समितीचां दोन वर्षात मिळालेला निधी कोविड साठी खर्च करावा लागला. कोविड संकट काळात देखिल विकासाच्या कामाला आपण गती दिलेली आहे. एवढेच नाही तर राज्य सरकारने लक्ष घातले म्हणूनच नगर पर्यंत रेल्वे आली. गडाच्या विकासासाठी निधी ची आवश्यकता आहे. बीड मागासलेला जिल्हा आहे. निधीची अजून गरज असून निधी येत्या काळात खेचून आणू असे धनंजय मुंडे म्हणाले.

बीड जिल्ह्यात लसीकरण अल्प प्रमाणात - टोपे
500 खाटासाठी लागणारी औषधे व इतर साहित्य तत्काळ उपलब्ध करुण दिले जातील. आरोग्य विभागातील सर्व पदे भरण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. असे सांगताना पुढे राजेश टोपे म्हणाले की, बीड जिल्ह्यात लसीकरण अल्प प्रमाणात झालेले आहे. अशी खंत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली तसेच याकडे धनजय मुंडे यांनी विशेष लक्ष द्यावे अशी सुचना केली.

दोन वर्षात 100 कोटीचा निधी आणणे सोपे नाही - मुश्रीफ
बीड विधानसभा मतदार संघात संदीप क्षीरसागर यांनी केलेले काम कोतुकास्पद आहे. दोन वर्षात 100 कोटीचा निधी आणणे सोपे नाही माञ त्यांनी करुण दाखवले आहे. त्यांनी यापुढच्या काळात देखील चागले काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करत संदीप क्षीरसागर यांचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोतुक केले.

आम्ही दिलेला शब्द पाळला - क्षीरसागर
कोविड काळात सर्व सामान्य नागरीकांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला. आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. अजित दादांनी कायमच बीड जिल्ह्याला झुकते माप दिलेले आहे. सिंचन क्षेत्रात वाढ करावी ही आमची मागणी दादांनी पुर्ण केली आहे. अमृत जल योजना कार्यान्वित असूनही 10 दिवसाला पाणी येते. नियोजन करून बीड शहराला 3 दिवसाला पाणी पुरवठा करु शकतोत ही बाब आमदार क्षीरसागर यांनी अजितदादांच्या समोर मांडली.


अशी आहेत विकास कामे
- जिल्हा रूग्णालय, बीड येथील वाढीव 200 खाटांच्या इमारतीचे बांधकाम 58.21 कोटी
- तालुका क्रिडा संकुलच्या जागेवर बॅडमिंटन हॉल-जिम हॉल व कार्यालय इमारत बांधकाम 1 कोटी
- नवीन व्हिव्हीआयपी विश्रामगृह बांधणे व जुन्या विश्रामगृहाचे नुतणीकरण 7.23 कोटी
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड या संस्थेची प्रशासकीय इमारत व कार्यशाळा बांधकाम 8 कोटी
- साक्षाळिपंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला-रस्ता 28 कि.मी. मध्ये सुधारणा 3.88 कोटी
- जोडवाडी-धारवंटा-साक्षाळिपंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला 28 कि.मी. रस्त्यावर पुलाचे बांधकाम 3.50 कोटी
- राममा ते जोडवाडी-धारवंटा-साक्षाळपिंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला रस्त्यावर पुलाचे बांधकाम 1 कोटी
- रामा ते बेलुरा-नारायणगड 30 कि.मी. रस्ता पुलाचे बांधकाम 0.60 कोटी,
- उरसे द्रुतगती वडगाव-चाकण-शिक्रापुर-जामखेड-बीड-म्हाळस जवळा-लऊळ-पात्रुड रस्ता लहान पुल बांधणे 2 कोटी
- पालवण-नागझरी-बेंडसुर-भायाळा-वैद्यकिन्ही-वैजाळा-पाचेगाव रस्ता लहान मुलाचे बांधकाम 2 कोटी
- बेलुरा-नारायणगड रस्त्यावर पुलाचे बांधकाम 1.50 कोटी
- साक्षाळिपंप्री-पारगाव सिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला रस्ते सुधारणा 3 कोटी
- करचुंडी ते पाटोदा रस्त्यात सुधारणा 2.90 कोटी,
- राममा ते पालवण-नागझरी-बेंडसुर-भायाळा-वैद्यकिन्ही-वैजाळा-पाचेगाव-पाचंग्री रस्ता सुधारणा 1.30 कोटी
- बीड पंचायत समिती, जि.प.बीड नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम 4.48 कोटी

ABOUT THE AUTHOR

...view details