महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पूजा चव्हाणच्या मृत्यूचे सत्य बाहेर येण्यासाठी सीबीआय चौकशी करा' - bhumata brigade latest news

तृप्ती देसाई यांनी आज शनिवारी पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची वसंतनगर येथे भेट घेऊन सांत्वन केले.

trupti desai
trupti desai

By

Published : Feb 20, 2021, 4:56 PM IST

Updated : Feb 20, 2021, 5:12 PM IST

परळी - पूजा चव्हाणच्या मृत्यूचे सत्य बाहेर येण्यासाठी सीबीआय चौकशी करुन निष्पक्षपातीपणाने चौकशी करा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईं यांनी केली. तृप्ती देसाई यांनी आज शनिवारी पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची वसंतनगर येथे भेट घेऊन सांत्वन केले.

'एखादा मंत्री गायब कसा काय होऊ शकतो?'

यावेळी त्या म्हणाल्या, की पूजाच्या मृत्यूला दोन आठवडे उलटले आहेत. मात्र पोलिसांच्या हाती ठोस असे काहीही लागलेले नाही. त्यामुळे विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका होत आहे. यावेळी त्यांनी आपण पूजाला न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे सांगितले. राज्यातील एखादा मंत्री गायब कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणातील दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे. यासाठी सीबीआय चौकशी करावी, असेही त्या म्हणाल्या.

Last Updated : Feb 20, 2021, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details