महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारत बंद : बीडमध्ये बहुतांश दुकाने बंद, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी - beed band news

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन जाचक कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी विविध संघटना पक्ष यांच्यासह शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी केली आहे.

बीड
बीड

By

Published : Dec 8, 2020, 12:15 PM IST

Updated : Dec 8, 2020, 4:41 PM IST

बीड -आतातरी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू आहे. मात्र पंजाब, हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रातदेखील आक्रमक आंदोलने येत्या काळात होऊ शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन जाचक कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी विविध संघटना पक्ष यांच्यासह शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी केली आहे.

भाजपा वगळता इतर पक्ष, संघटनांचा पाठिंबा

शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, या मागणीसाठी विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिल्यानंतर मंगळवारी बीड शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजपा वगळता सर्व पक्ष व संघटनांनी शेतकरीविरोधी कायद्याला विरोध करत भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

बहुतांश दुकाने बंद

शहरातील सुभाष रोड, बस स्थानक परिसर, तसेच बार्शी नाका परिसरात बहुतांश दुकाने बंद होती. मात्र छोट्या-मोठ्या दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवले असल्याचे चित्र बीड शहरात पाहायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करण्यासाठी आवाहन केले. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला पाहिजे, यासाठी कृषी कायदे रद्द होणे आवश्यक आहे. केंद्र सरकार कडून वार शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. रस्त्यावर उतरून सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आवाज उठवत आहोत.

Last Updated : Dec 8, 2020, 4:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details