बीड -शहरातील अनेक लाभार्थ्यांना केवळ तांत्रिक अडचणीमुळे घरकुलाचा ( Gharkul scheme ) लाभ घेता येत नव्हता ही बाब निदर्शनास आल्या नंतर युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून ज्यांच्याकडे पिटीआर ( income proof ) आहे, त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा असा आदेश मंजूर करून घेतला. डॉ योगेश क्षीरसागर यांनी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून अर्जदार लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे अशी मागणी केली. त्यानुसार पिटीआरवर नाव नोंदणी असणाऱ्याना घरकुल देण्याचा मार्ग मोकळा झाला असून ४०० ते ४५० लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारणार आहे.
Gharkul Scheme : पीटीआर असलेल्या लाभार्थ्यांना मिळणार घरकुल - नगर परिषद बीड
उत्पन्नाचा दाखला ( income proof ) असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगर परिषद बीड ( City Council Beed ) प्रधानमंत्री आवास योजने ( Pradhan Mantri Awas Yojana ) अंतर्गत ४०० ते ४५० लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारणार आहे.
Gharkul Scheme
घरकुलाचा लाभ देण्याचा मार्ग मोकळा - नगर परिषद बीड प्रधानमंत्री आवास योजने ( Pradhan Mantri Awas Yojana ) अंतर्गत डीपीआर-१०९-९१०-९८९-२०० या चार डीपीआर मधिल जवळपास ४००-४५० मंजुर असलेल्या लाभार्थ्यंकडे जागेचा फक्त पिटीआर होता. मात्र, काही तांत्रिक बाबीमुळे या लाभार्थ्यना घरकुलाचा लाभ देता येत नव्हता. मुख्याधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चे दरम्यान सदरील लाभार्थ्यना लाभ देण्याचा मार्ग मोकला झाला आहे.
Last Updated : Nov 10, 2022, 10:20 PM IST