बीड - जिल्हा प्रशासन कागदावर केव्हा काय करेल याचा नेम नाही. याचा प्रत्यय बीडमध्ये आला आहे. पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मागायला गेलेल्या 70 वर्षांच्या शेतकऱ्याला जिल्हा प्रशासनाने मृत ठरवले आहे. अनुपकुमार गणेशप्रसाद मिश्रा (रा. धारूर ता. बीड) असे मृत दाखवलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाच्या कारभारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रशासनाने मृत ठरवलेले शेतकरी अनुपकुमार गणेशप्रसाद मिश्रा हेही वाचा -हिंगणघाट जळीतकांड : 'ती' मुलगी कुठल्याही परिस्थितीत बरी व्हायला हवी - विद्या चव्हाण
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील धारूर शहरातील अनुपकुमार गणेशप्रसाद मिश्रा यांच्या नावे शेतजमीन आहे. ४ डिसेंबरला त्यांनी पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन फॉर्म भरला. परंतु, त्याची पडताळणी करून अर्ज मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यावर रक्कमच जमा झाली नाही. त्यामुळे ते तहसील कार्यालयात गेले. त्यांना पैसे मिळण्याबाबत अडचणी काय आणि त्रुटी काय, याचे उत्तर देण्याऐवजी ऑनलाईन नोंदीत मृत असल्याचा स्टेटस रिपोर्ट त्यांच्या हाती देण्यात आला. संबंधीत कारकून कानावर हात ठेवून रिकामा झाला पण, हे ऐकूण अनुपकुमार मिश्रा यांना धक्काच बसला.
अनुपकुमार मिश्रा यांनी आधार कार्ड दाखवून ज्या यंत्रणेने मृत्यू प्रमाणपत्र दिले त्याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. याप्रकरणाची मोठी चर्चा होत आहे. मिश्रा यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी केली आहे.