बीड -मागील काही दिवसांपासून तृतीयपंथी सपना आणि बाळू यांच्या विवाहाची राज्यभरात चर्चा होती. आज (सोमवार) बीड शहरातील कंकालेश्वर मंदिरात दोघांचा विवाह सोहळा संपन्न ( Beed Transgender Sapna Balu Got Married ) झाला. समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी यांनी कन्यादान केलं ( Transgender Wedding In Beed ) आहे. या विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तृतीयपंथी सपना आणि बाळू हे गेल्या दोन वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेम झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचे लग्न लावून देण्यासाठी शहरातील काही समाजसेवक, पत्रकारांनी पुढाकार घेतला. आणि आज महिला दिनाच्या पूर्वसंधेला दोघे विवाहबंधनात अडकले आहे. कंकालेश्वर मंदिरात तृतीयपंथी सपना आणि बाळूचा विवाह पार पडला. हा लग्न सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती.