बीड - शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या बिंदुसरा नदीपात्रात नगरपरिषद कर्मचारीच कचरा टाकत असल्याने तिथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या विरोधात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.
बिंदुसरा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केला सत्कार - बीड नगरपरिषद बातम्या
शहरातून उचललेला कचरा हा कचराडेपोत न टाकता बिंदुसरा नदीपात्रात टाकला जातो. परिणामी नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या विरोधात शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.
बीड शहरातील विविध भागांत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. यातच नगरपरिषद शहरातून उचललेला कचरा हा कचराडेपोत न टाकता बिंदुसरा नदीपात्रात टाकते. परिणामी, नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याविरोधात शनिवारी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. ज्यावेळी नगरपरिषद कर्मचाचारी नदीपात्रात कचरा टाकत होते, त्यावेळी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांद्वारे या कर्मचाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. हलगीच्या वादनात शाल, श्रीफळ देऊन गांधीगिरी दाखवण्यात आली. बीड शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या बिंदूसरेत कचरा ओतण्याचे पाप नगरपरिषद करत असल्याचा आरोप यावेळी शिवसंग्रामच्यावतीने करण्यात आला. यावेळी युवक जिल्हा सरचिटणीस विनोद हातागळे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अक्षय माने, सरचिटणीस प्रशांत डोरले व कार्यकर्ते उपस्थित होते.