कौतुकास्पद..! बीड पोलिसांच्या कोविड व्यवस्थापनाची देशपातळीवर दखल
कोरोनाच्या महामारीत बीड पोलिसांनी केलेल्या व्यवस्थापनाची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. पोलीस कायम रस्त्यावर असल्याने देशभरात पोलिसांनी कोरोनाला कसा प्रतिसाद दिला याचा अहवाल भारतीय पोलीस दलाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात बीडला स्थान मिळाले आहे.
बीड : कोरोनाच्या महामारीत बीड पोलिसांनी केलेल्या व्यवस्थापनाची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. बीड पोलिसांच्या कोरोना व्यवस्थापनावरील अहवालाला 'भारतीय पोलीस संशोधन आणि विकास' या मासिकात प्रसिद्धी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून मुंबई, मालेगाव आणि बीड या तीन ठिकाणच्या व्यवस्थापनाची दखल अहवालात घेण्यात आली आहे.
कोरोनाचे संकट सर्वांसाठीच आव्हान ठरलेले आहे. त्यातही पोलीस दलासाठी हे मोठे आव्हान आहे. पोलीस कायम रस्त्यावर असल्याने देशभरात पोलिसांनी कोरोनाला कसा प्रतिसाद दिला याचा अहवाल भारतीय पोलीस दलाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. 'भारतीय पोलीस संशोधन आणि विकास' या मासिकात देशपातळीवरील मोजक्या प्रयोगांना स्थान देण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातून मुंबई, मालेगाव आणि बीड या तीन पोलीस दलांनी राबविलेले प्रयोग प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
बीड पोलिसांच्या वतीने तत्कालीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी लिहलेल्या संशोधन अहवालाला या मासिकात स्थान देण्यात आले असून या माध्यमातून बीड जिल्हा पोलिसांच्या कोरोना व्यवस्थापनाची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. याबद्दल बीड जिल्हा पोलीस दलाचे अभिनंदन केले जात आहे.