बीड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज (रविवार) देशभर 'जनता कर्फ्यु' लागू करण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या आवाहनाला बीडमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. बीड शहरातील बस स्थानकात शुकशुकाट पाहायला मिळाला. एसटी महामंडळ प्रशासनाने सर्व बसफेऱ्या रद्द केल्या आहेत. शहरातील रहदारीचा ठिकाणी, बसस्थानकावर एकही व्यक्ती नाही.
जनता कर्फ्यु: बीड शहरात शुकशुकाट, बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद - बीड शहरात शुकशुकाट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज (रविवार) देशभर 'जनता कर्फ्यु' लागू करण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या आवाहनाला बीडमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बीड शहरात शुकशुकाट, बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद
बीड शहरात शुकशुकाट, बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद
जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. कोरोना विषाणूच्या संदर्भात खबरदारी म्हणून बंदचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिक आपापल्या घरांमध्ये बसलेले आहेत. बसफेऱ्या देखील रद्द केल्या असल्यामुळे सर्व बस एका जागेवर उभा केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केवळ पोलीस प्रशासनाचे अधिकारी रस्त्यावर पाहायला मिळत आहेत.