बीड - पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बदली झाल्यानंतर राजा रामास्वामीहे बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झाले असून शनिवारी त्यांनी बीड पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी बीड पोलीस दलाकडून त्यांना सलामी देत स्वागत करण्यात आले.
मागील 14 महिने हर्ष पोद्दार यांनी बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून चांगले काम केले आहे. कोरोनाच्या काळात निर्माण झालेली बिकट परिस्थिती हाताळण्यात पोद्दार हे यशस्वी ठरले होते. हर्ष पोद्दार यांची बीडमधून बदली झाली आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना पुढील नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यांच्या जागी मुंबई येथून गुप्तचर विभागातील राजा रामास्वामी हे नवे बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत. शनिवारी त्यांनी बीड पोलीस अधीक्षक पदभार स्वीकारला.