महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CORONA : 'त्या' कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर प्रशासन करणार अंत्यसंस्कार, नातेवाईकही कोरोनाबाधित - बीड कोरोना

आष्टी तालुक्यातील पाटणसांगवी येथे पाहुणे आलेल्या ७ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ६५ वर्षीय वृद्धेचा बीडच्या जिल्हा रुग्णालयात पहाटे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 'त्या ' महिलेच्या पार्थिवावर आता प्रशासन अंत्यसंस्कार करणार आहे. बीडच्या भगवानबाबा प्रतिष्ठान जवळील स्मशानभूमीत त्या महिलेवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Beed Municipality administion do Funeral corona positive woman
'त्या' कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर प्रशासन करणार अंत्यसंस्कार

By

Published : May 18, 2020, 3:30 PM IST

बीड - कोरोनामुळे मुंबईहून कुटुंबासह गावची वाट धरलेल्या त्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 60 वर्षीय महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एवढी त्रेधातिरपीट उडावी हे दुर्दैव आहे. अंत्यसंस्कारासाठी ना सगे सोयरे जवळ आहेत, ना गावातील लोक. आता जिल्हा प्रशासनानेच त्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा बीड येथील भगवानबाबा प्रतिष्ठान येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाबाधित महिलेला व्याह्याच्या गावातून बीडच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यूने गाठले आणि मृत्यूनंतर आता नातेवाईकांना अंत्यसंस्कार देखील नशिबी नाहीत. कोरोनामुळे त्या कुटुंबाची पूर्ती वाताहात झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 'त्या ' महिलेच्या पार्थिवावर आता प्रशासन अंत्यसंस्कार करणार आहे. बीडच्या भगवानबाबा प्रतिष्ठान जवळील स्मशानभूमीत त्या महिलेवर अंत्यसंस्कार होणार असल्याचे बीडचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांनी सांगितले आहे.

आष्टी तालुक्यातील पाटणसांगवी येथे व्याही म्हणून आलेल्या ७ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ६५ वर्षीय वृद्धेचा बीडच्या जिल्हा रुग्णालयात पहाटे मृत्यू झाला. मूळचे नगर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या या कुटुंबातील महिलेला मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी स्वतःचे गाव देखील नशिबी आले नाहीच. मात्र आता अंत्यसंस्काराला स्वकीयांची उपस्थिती देखील मिळणे अवघड आहे.

या कुटुंबातील ६ व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना बाहेर येऊ दिले जाणार नाही. कोरोनाग्रस्तांच्या अंत्यविधीला इतरही कोणी येणार नाही. त्यामुळे आता प्रशासनामार्फत 'त्या ' महिलेवर अंत्यसंस्कार होणार आहेत. आरोग्य विभागाने यासंदर्भात पोलीस आणि बीड नगरपालिकेला माहिती दिली असून नगरपालिकेने अंत्यविधीची तयारी केल्यानंतर आरोग्यविभाग त्या ठिकाणी पार्थिव घेऊन जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details