बीड Beed Molestation News:बीडच्या गेवराई शहरात एका कापड दुकानात काम करणाऱ्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलानं त्याच्याच मालकाच्या तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केलाय. ही खळबळजनक घटना गेवराई शहरात घडलीय. याप्रकरणी तिच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून गेवराई पोलिसात गुन्हा नोंद झालाय. पोलिसांनी पंधरा वर्षीय अल्पवयीन आरोपीला अटक केलीय. दुपारी मालक काही कामानिमित्त बाहेर गेले होते, याचा फायदा या मुलाने घेतलाय. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आलीय. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडालीय.
अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ :बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळतेय. त्यामुळं कोणावर विश्वास ठेवावा, हाच प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांपुढे पडलाय. महिला व मुलींवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ (minor boy molested his owners daughter) होताना दिसतंय. दिवसेंदिवस पोलीस प्रशासन अशा आरोपींवर कठोर कार्यवाही करतंय. मात्र, अशा प्रकारच्या कृत्यांमुळं समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं पालकांनी वेळीच अनोळखी व्यक्तींबरोबर कसल्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत, त्याचबरोबर आपल्या महिला मुलींना अशा घटनांपासून वाचविण्यासाठी आपण त्यांच्याबरोबर राहणं तितकंच गरजेचं आहे. (Molestation News)