बीड - कोरोना काळात महाराष्ट्रातील अनेक बचत गट आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने महिला बचत गटांचे संपूर्ण कर्ज माफ करून महिलांना नव्याने कर्ज द्यावे, या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी बीड जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. बीड जिल्ह्यातील वीज ग्राहकांची वीज बिल माफ करावे, अशी मागणी यावेळी झाली. हातावर पोट असलेल्या नागरिकांना दोन वेळ जेवणाची पंचायत आहे. अशा परिस्थितीत वीज बिल भरायचे कसे? असा प्रश्न अनेक कुटुंबांच्या समोर आहे. त्यामुळे वीजबिलात सवलत देण्याची मागणी त्यांनी केली.