महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाॅकडाऊनचा पुर्नविचार करावा; पंकजा मुंडेंची जिल्हा प्रशासनाकडे मागणी - बीड कोरोना लेटेस्ट न्यूज

कडक लाॅकडाऊनमुळे रोजंदारी काम करणारे आणि ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांनाही या नियमांचा फटका बसणार आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांचीही दक्षता घेऊन उपाय योजना कराव्यात असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडें
पंकजा मुंडें

By

Published : Mar 26, 2021, 1:49 PM IST

Updated : Mar 26, 2021, 7:40 PM IST

बीड-लाॅकडाऊनमध्ये जिल्हा प्रशासनाने सकाळी केवळ दोन तासांची दिलेली शिथिलता ही व्यापारी आणि ग्राहक या दोन्हींच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीची असून यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने सदरची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांनी केली आहे. दरम्यान, लाॅकडाऊनचा फटका हातावर पोट असणाऱ्यांना बसू नये. याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणीही पंकजा मुंडेनी केली आहे.

लाॅकडाऊनचा पुनर्विचार करावा; पंकजा मुंडेंची जिल्हा प्रशासनाकडे मागणी


शासनाने दिलेल्या वेळेचा पुनर्विचार करावा
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हयात लाॅकडाऊन कडक करण्यात आला आहे. तथापि या निर्णयाला सर्व सामान्य जनता व व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. संपूर्ण लाॅकडाऊन ऐवजी निर्बंध कडक करावेत, अशी जनतेची मागणी असताना प्रशासनाने याचा विचार केला नाही. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी दिलेली सकाळी ७ ते ९ वा. ही वेळ हास्यास्पद असून त्यांच्या व ग्राहकांच्या दोन्हीच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीची आहे. इतक्या कमी वेळेत काहीच होणार नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. कोरोनामुळे अगोदरच बाजारपेठ थंड आहे, त्यातच प्रशासनाने अशा प्रकारचे तुघलकी निर्बंध लावून नयेत. त्यामुळे त्यांच्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने दिलेल्या वेळेचा पुनर्विचार करावा आणि व्यापाऱ्यांना वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.


हातावर पोट असणाऱ्यांना फटका
कडक लाॅकडाऊनमुळे रोजंदारी काम करणारे आणि ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांनाही या नियमांचा फटका बसणार आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांचीही दक्षता घेऊन उपाय योजना कराव्यात असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Last Updated : Mar 26, 2021, 7:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details