बीड - जिल्ह्यात संचारबंदी दरम्यान परळी तालुक्यातील सिरसाळा येथील पवार गल्लीत काही नागरिक रस्त्यावर उभे होते. यावेळी पोलीस तिथे पोहचले. यावेळी पोलीस व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तेव्हा पोलिसांनी थेट लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. यावेळी नागरीक संतापले आणि नागरिकांनी देखील पोलिसांवर हल्ला चढविला.
बीड : संचारबंदी दरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये फ्री स्टाईल मारहाण
पोलीस आणि नागरिक यांच्यात तब्बल दहा मिनिटे फ्री स्टाईल हाणामारी झाली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आणि नागरिक यांच्यात तब्बल दहा मिनिटे फ्री स्टाईल हाणामारी झाली. या मारहाणी दरम्यान पवार वस्तीवरील महिलांवर पोलिसांनी हात उचलला असल्याचेही प्रत्यक्षदर्शी नागरिकांमधून सांगण्यात येत आहे.
पवार गल्ली येथील काही महिला-पुरुष नागरिक जखमी झाले आहेत. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सिरसाळा परिसरात तणावपूर्ण स्थिती आहे. पुढील 20 दिवस बीड जिल्ह्यात लॉक डाऊन आहे. या दरम्यान नागरिकांनी व पोलिसांनी संयम ठेवून एक दुसऱ्याला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. मात्र तसे होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.