महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Beed Year Ender 2021 : अल्पवयीन मुलीवर 600 जणांचा अत्याचार.. नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाला चालना यासह अन्य घटनांनी चर्चेत राहिला बीड जिल्हा

बीड जिल्हा 2021 मध्ये अनेक घडामोडींनी राज्यभर चर्चेत राहिला. सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यात सहाशेहून अधिक जणांनी (minor girl raped by 600 persons) बलात्कार केल्याची घटना समोर आल्याने जिल्ह्यासह राज्याचे समाजमन ढवळून निघाले. त्याचबरोबर घाटशिळ-पारगाव येथे एका मुलाने आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. याबरोबरच अन्य घटनांनी बीड जिल्हा चर्चेच राहिला त्यातील 10 ठळक घडामोडी..

Beed district year ender
Beed district year ender

By

Published : Dec 31, 2021, 7:01 PM IST

बीड - बीड जिल्हा 2021 मध्ये अनेक घडामोडींनी राज्यभर चर्चेत राहिला. सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यात सहाशेहून अधिक (minor girl raped by 600 persons) जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आल्याने जिल्ह्यासह राज्याचे समाजमन ढवळून निघाले. त्याचबरोबर घाटशिळ-पारगाव येथे एका मुलाने आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. याबरोबरच अन्य घटनांनी बीड जिल्हा चर्चेच राहिला त्यातील 10 ठळक घडामोडी..

  • 1) आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील वक्फ बोर्डाची जमीन भलत्यांच्याच नावे करण्यात आल्याच्या प्रकरणात जमीन खालसाचे आदेश देणारा तत्कालीन भूसुधार उपजिल्हाधिकारी आणि सध्या बडतर्फ करण्यात आलेला उप जिल्हाधिकारी डॉ. एन आर शेळकेला अखेर अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी त्याला औरंगाबाद येथून अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपी समोर आले असून आणखी एक उपजिल्हाधिकारी देखील पोलिसांच्या रडारवर आहेत. आष्टी तालुक्यातील देवस्थान जमीन घोटाळ्यात आरोपींची अटक होत नसल्याची तक्रार आ. बाळासाहेब आजबे यांनी थेट पोलीस महासंचालकांकडे केल्यानंतर आता या प्रकरणात ही कारवाई झाली आहे.
    बीड जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
  • 2) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील राजकीय समीकरणे काय असतील याबाबत राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेतले आहे. मराठवाड्यात वंजारी समाज मोठ्या प्रमाणात आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या गटाला भाजप जाणीवपूर्वक डावलत असल्याचा प्रत्यय यापूर्वी देखील वारंवार आला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
    बीड जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी

  • 3) उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणी एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, धर्मांतरासाठी परदेशातून निधी मिळत आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. धर्मांतर प्रकरणात तीन धर्मगुरूंची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून आले. एटीएस आता तिन्ही धार्मिक गुरूंची चौकशी करून धर्मांतर प्रकरणाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशांत कुमार यांनी सांगितलं की, या आरोपींच्या कॅनडा आणि कतार कनेक्शनची चौकशी सुरू आहे
    बीड जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी

  • 4) बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बीड जिल्ह्याबाहेर बदली करून त्यांना उच्च न्यायालयाच्या अवमानाची नोटीस जारी करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. एस.जी. मेहरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
    बीड जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी

  • 5) राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली आहे. चक्क सोळा वर्षाच्या (अल्पवयीन) मुलीवर सहा महिन्यात सहाशेहून अधिक व्यक्तींनी अत्याचार केले असल्याची घटना समोर आली आहे. बाल कल्याण समिती अध्यक्ष तथा प्रथम वर्ग दंडाधिकारी डॉ. अभय वनवे यांनी चिंता व्यक्त करत 'ईटीव्ही भारत' शी बोलताना संगितले, की संबंधित अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीचे अनेकांनी अत्यंत क्रूरतेने शोषण केलेले आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यात चारशेहून अधिक व्यक्तींनी अत्याचार केलेला आहे. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचादेखील समावेश असून संबंधित अल्पवयीन मुलगी वीस आठवड्याची गर्भवती आहे. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. याची चौकशी करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या असल्याचे डॉ. वनवे म्हणाले..
    बीड जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी

  • 6) एकीकडे फादर्स-डे निमित्ताने संपूर्ण देशभरात वडिलांचे ऋण व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यातील घाटशिळ-पारगाव येथे एका मुलाने आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गंभीर बाब म्हणजे या मारहाणीत आईचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमधून या मुलाच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. बाबासाहेब खेडकर असे मारहाण करणाऱ्या विकृत मुलाचे नाव आहे, तर शिवबाई खेडकर असे मृत आईचे नाव आहे.
    बीड जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी

  • 7) नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी वरळी कार्यालयात घेतलेल्या मेळाव्यातील गर्दीमुळे भाजप नेत्या पंकजा मुंडेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जमावबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
    बीड जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी

  • 8) जिल्ह्यात तसेच संपूर्ण राज्यात ग्रामीण भागात महिलांना संपत्तीत (घर-जमीन) अधिकार दिला जात नाही. परिणामी महिलांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत गुरुवारी शेकडो महिलांनी केज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महिला अधिकार मंच, महाराष्ट्र यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात संपत्तीमध्ये पतीबरोबर पत्नीचेही नाव लावले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिलांना संपत्तीमध्ये समान अधिकार देणे महत्वाचे असल्याचे मत महिला अधिकार मंचच्या पदाधिकारी मनिषा घुले यांनी व्यक्त केले.
    बीड जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी

  • 9) नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने शंभर कोटी मंजूर केले असून यामुळे कामाला आणखी गती येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार" असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
    बीड जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी

  • 10) जमीन विकून आलेले पैसे मला का देत नाहीस, म्हणत चक्क जन्मदात्या आईलाच दगडाने ठेचून मारल्याची घटना शुक्रवारी (दि. 20 ऑगस्ट) घडली असून शनिवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली आहे. मदन पांडुरंग मानगिरे, असे आरोपी मुलाचे नाव आहे तर प्रयागाबाई पांडुरंग मानगिरे (वय 60 वर्षे, रा. चौसाळा, ता. बीड), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
    बीड जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी

ABOUT THE AUTHOR

...view details