बीड - सहा विधानसभा मतदार संघांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 67.99% मतदान झाले आहे. यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण-भाऊ तसेच बीड विधानसभा मतदारसंघात क्षीरसागर काका-पुतणे यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. मतमोजणीनंतर नेमकं काय होईल, याचा आढावा घेतला आहे, ज्येष्ठ पत्रकार संजय मालाणी यांच्याकडून...
बीड जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघात 3 लाख 52 हजार 192 पैकी 2 लाख 60हजार 891 मतदान झाले असून, याचे प्रमाण 74.08 टक्के आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघात 3 लाख 31 हजार 160 मतदानापैकी 2 लाख 27 हजार 657 मतदान झाले असून, 68.75 टक्के मतदानाची नोंद या मतदारसंघात झाली आहे. बीड विधानसभा मतदारसंघात 3 लाख 35 हजार 150 मतांपैकी 2 लाख 19 हजार 500 मतदान झाले असून, 65.49 टक्के मतांची नोंद झाली आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 70 हजार 450 मतांपैकी 2 लाख 39 हजार 073 मतदान झाले आहे. 64.54 टक्के मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला आहे. केज विधानसभा मतदारसंघात 3 लाख 61 हजार 704 मतांपैकी 2 लाख 27 हजार 975 म्हणजेच 63.3 टक्के मतदान झाले आहे.