बीड -जिल्ह्यातील जनता व प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून बीड जिल्हाधिकारी यांनी 'जनता संवाद अभियान' सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी मांडवजाळी या गावात जाऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ज्वारीची पेरणी केली.
बीड जिल्हा प्रशासनाचा कौतूकास्पद उपक्रम , थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केली ज्वारीची पेरणी - शेतात जाऊन केली ज्वारीची पेरणी
जिल्ह्यात प्रशासनाने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला 'जनता संवाद अभियान' असे नाव देऊन जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे.
जिल्ह्यात प्रशासनाने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला 'जनता संवाद अभियान' असे नाव देऊन जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे. थेट गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे. हा अनोखा उपक्रम बीड जिल्ह्यात सुरू झाला असून रविवारी बीड तालुक्यातील मांडवजाळी येथे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जाऊन गावातील शेतकरी सुभाष बहिरवाल यांच्या शेतात ज्वारीची पेरणी केली.
त्यानंतर गावातील नागरिकांशी संवाद साधला व शेवटी गावात पाण्याची टाकी व फिल्टर प्लॅन देऊन गावकऱ्यांचा निरोप घेतला. जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या या उपक्रमाचे मांडवजाळी येथील ग्रामस्थांनी मोठे कोतुक केले आहे.
सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. परतीच्या पावसात पिके उध्वस्त झालेली आहेत. शेतीची मशागत करण्यासाठी देखील शेतकऱ्यांकडे पैसा नाही . अशा परिस्थितीत थेट जिल्हा प्रशासन गावात येऊन ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणी विचारत असल्याने येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.