बीड -जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले जिल्ह्यातील कोरोनाचे पहिले दोन रूग्ण बरे झाले आहेत. आज जिल्हा प्रशासनाने त्यांना वाजत गाजत डिस्चार्ज दिला. यावेळी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
बीडमध्ये दोघा कोरोनामुक्त रुग्णास जिल्हा प्रशासनाकडून वाजतगाजत डिस्चार्ज - बीड कोरोना मुक्त रूग्ण
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले जिल्ह्यातील कोरोनाचे पहिले दोन रूग्ण बरे झाले आहेत. बीडच्या माजलगाव तालुक्यातील हिवरा आणि गेवराई तालुक्यातील इटकूर येथील हे दोन रूग्ण होते. जिल्हा प्रशासनाने त्यांना वाजत गाजत डिस्चार्ज दिला.

कोरोनामुक्त रूग्ण
कोरोनामुक्त झालेल्या दोघांना जिल्हा प्रशासनाने दिला वाजतगाजत डिस्चार्ज
बीडच्या माजलगाव तालुक्यातील हिवरा आणि गेवराई तालुक्यातील इटकूर येथील हे दोन रूग्ण होते. हे दोघेही आता कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले. कोरोनाची ही लढाई त्यांनी जिंकल्यामुळे त्यांची मोठ्या उत्साही वातावरणात घरी पाठवणी करण्यात आली. यावेळी पोलीस पथकाने बँड वाजवून वाजत-गाजत त्यांना निरोप दिला. तर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱयांनी केक कापून आनंद व्यक्त केला. यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.