बीड-बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दिनांक 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मात्र आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता नवीन नियमांनुसार अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली आहे.
नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे