महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Beed Crime : बापाने पोटच्या पोरावर केले कोयत्याने सपासप वार - बीड क्राईम

गेवराई पोलिसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. (Beed Crime) गेवराई शहरातील मोंढा भागात फळव्रिकी करणाऱ्या स्वतःच्या मुलावरच बापाने कोयत्याने सपासप वार (father stabbed son with sharp weapon) केले. घटनेमागील कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ही घटना गेवराईच्या मोंढा नाका भागात घडली. जखमी मुलाला गेवराई येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल (injured admitted for treatment) करण्यात आले. (Latest news from Beed)

Beed Crime
कोयत्याने सपासप वार

By

Published : Jan 3, 2023, 5:25 PM IST

Updated : Jan 3, 2023, 9:32 PM IST

बीड :घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Beed Crime) मात्र याबाबत गेवराई पोलीस विचारले असता अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मिळाली. (father stabbed son with sharp weapon) बीड जिल्ह्यात अनेक अन्याय अत्याचाराच्या घटना आपण पाहिल्या आहेत. (Latest news from Beed) मात्र ही घटना फारच वेगळी आहे. (injured admitted for treatment)

ही तर धक्कादायक घटना :वडील आणि मुलांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर चक्क खुनाच्या घटनेत झाले आहे. कारण चक्क बापानेच आपल्या मुलावर कोयता उचलल्याने ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. जन्मदात्या बापाने असे कृत्य करणे किती योग्य आहे, अशी चर्चा सर्व सामान्य नागरिकांतून केली जात आहे.

मुलगा गंभीर जखमी :घटनाही जरी घडलेली असली तरी त्याच्यामध्ये जो व्यक्ती आहे तो गंभीर जखमी असल्याने एमएलसी दाखल करण्यात आलेली आहे. पोलीस जबाब घेण्यासाठी गेले होते. मात्र ही व्यक्ती गंभीर जखमी असल्याने तो शुद्धीवर नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे जबाब घेता आला नाही. तो शुद्धीवर आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू असे डॉक्टरांनी सांगितले आहे. याच्या विषयी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही माहिती दिली आहे.

Last Updated : Jan 3, 2023, 9:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details