महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमधील गर्भपात प्रकरणः आज लागणार निकाल - court decision

या प्रकरणामध्ये एकूण १७ आरोपी होते. त्यातल्या जळगावच्या डॉ. राहुल कोल्हे यांचे अपघाती निधन झाले होते.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 8, 2019, 4:34 PM IST

बीड- परळीतल्या गर्भपात करताना मृत्यू झालेल्या महिला प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. मे २०१२ मध्ये परळीत सुदाम मुंडेच्या रुग्णालयात विजयमाला पटेकर या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. सर्वांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.

परळीत बेकायदेशीर गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाला होता. मे २०१२ या वर्षी ही घटना घडली होती. या प्रकरणी कलम ३०४, ३१२, ३१४, ३१५ आणि ३१६ नुसार गुन्हा दाखल झाला होता. यात पीसीपीएनडीटी आणि एमटीबी अॅक्ट सेक्शन ३ A, सेक्शन ९, सेक्शन १७, सेक्शन २९ नुसार गुन्हा दाखल झाला होता. याचबरोबर एमटीबी कायद्यानुसार सेक्शन ४ व ६ अन्वये गुन्हा या बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या मुंडे डॉक्टर दाम्पत्यावर दाखल झाला आहे.

या प्रकरणामध्ये एकूण १७ आरोपी होते. त्यातल्या जळगावच्या डॉ. राहुल कोल्हे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यामुळे उर्वरित १६ आरोपी संदर्भात काही वेळात निकाल येणे अपेक्षित आहे. बीडच्या जिल्हा न्यायालयात हा निकाल लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details