बीड-गणेशोत्सवासाठी बीड, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी या शहरासाठीचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र, केवळ २ फूट उंची पर्यंतच्या श्रीगणेश मूर्तीच्या दुकाने, फळे, भाजीपाला, दुध, मेडिकल, पूजेच्या साहित्यांची दुकाने व हार-फुलांची दुकाने या सर्व साहित्याची घाऊक व किरकोळ विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी बीड जिल्ह्यातील सहा शहरासाठींचे निर्बंध शिथील - beed lockdown newsw
गणेशोत्सवासाठी बीड, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी या शहरासाठीचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.केवळ 02 फूट उंची पर्यंतच्या श्रीगणेश मूर्तीच्या दुकाने, फळे, भाजीपाला, दुध, मेडिकल, पूजेच्या साहित्यांची दुकाने व हार-फुलांची दुकाने या सर्व साहित्याची घाऊक व किरकोळ विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सुशोभीकरणाचे साहित्य विक्री दुकाने ,मिठाई दुकाने,हॉटेल रेस्टांरट यांना व इतर सर्व प्रकाराच्या दुकांनाना उघडण्यास परवानगी असणार नाही.
कोरोना विषाणू संसर्गामुळे शहरामधील गर्दी नियंत्रित करणे आवश्यक आहे. शहरातील, गावातील वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी राहतील आणि एकाच ठिकाणी, रस्त्यावर दुकानांची गर्दी होणार नाही याची जबाबदारी संबधित नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांची राहील, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रवीण कुमार धरमकर यांनी दिले आहेत. सुशोभीकरणाचे साहित्य विक्री दुकाने ,मिठाई दुकाने,हॉटेल रेस्टॉरंट यांना व इतर सर्व प्रकाराच्या दुकांनाना उघडण्यास परवानगी असणार नाही, असे आदेश स्वतंत्रपणे देण्यात येणार आहेत.
सर्वांनी कोरोना विषयक सर्व खबरदारी पाळूनच कामकाज करावे. निर्बंध शिथील केलेल्या शहरांमध्ये अँटिजेन टेस्टीची मोहिम चालू राहील, त्यास सर्व व्यापाऱ्यांनी त्यास सहकार्य कारावे. कनटेंनमेंट झोनमधील निर्बंध तसेच कायम राहतील. यापूर्वी कोरोनाबाधित रुग्णाची संख्या बीड जिल्ह्यात मोठया प्रमाणात वाढत असल्यामुळे बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी, केज व आष्टीे शहरे 10 दिवसांकरिता 21 ऑगस्ट रात्रीपर्यंत पूर्णपणे सर्व दृष्टीने बंद करण्यात आले होते. परंतु, गणेशोत्सवाच्या दृष्टीने हे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.