महाराष्ट्र

maharashtra

दिवस मतसंग्रामाचा : बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरणात मतदारांनी लावल्या रांगा

By

Published : Oct 21, 2019, 10:54 AM IST

जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदार संघासाठी आज (सोमवारी) मतदान होत आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान झाले असल्याची आकडेवारी प्रशासनाकडून येत आहे. तसेच जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस देखील सुरू आहे.

बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरणात मतदारांनी लावल्या रांगा

बीड - जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदार संघासाठी आज (सोमवारी) मतदान होत आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान झाले असल्याची आकडेवारी प्रशासनाकडून येत आहे. तसेच जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस देखील सुरू आहे.

बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरणात मतदारांनी लावल्या रांगा

हेही वाचा -जळगावात मतदानाला सुरुवात; पावसामुळे मतदारांची मतदान केंद्रांकडे पाठ

जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघात काका-पुतणे तर परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण-भावांची लक्षवेधी लढत आहे. यासाठी 3 हजारवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अशा बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

हेही वाचा -विधानसभा निवडणूक : नागपुरात मतदानाला सुरुवात, मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

हेही वाचा -विधानसभा निवडणूक : नागपुरात मतदानाला सुरुवात, मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details