बीड-जिल्ह्यातील बीड, माजलगांव, परळी , अंबाजोगाई , केज व आष्टी या शहरांमधील गणेशोत्सवात लागणारे सुशोभिकरणाचे साहित्य विक्री दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट यांना व इतर सर्व प्रकारच्या दुकानांना 23 ऑगस्ट पासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी प्रविण कुमार धरमकर यांनी दिले आहेत. सर्वांनी कोरोना विषयी सर्व खबरदारी पाळून कामकाज करावे. कंटेनमेंट झोन असणाऱ्या परिसरातील निर्बंध तसेच कायम राहतील असे, जिल्हा प्रशासनाच्या आदेशात म्हटले आहे.
बीड, माजलगांव, परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी या शहरांमध्ये यापूर्वी २१ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत लाॅकडाऊन लागू करण्यात आले होते. सुशोभिकरणाचे साहित्य विक्री करणारी दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, इतर सर्व प्रकारच्या सर्व दुकानांना उघडण्याच्या परवानगीबाबत लाॅकडाऊन नंतर स्वतंत्र आदेश जाहीर करण्यात येतील,असे यापूर्वीच्या आदेशात म्हटले होते.
बीड जिल्ह्यातील 6 शहरांतील मिठाई दुकाने, हॉटेल, सुशोभिकरण साहित्य विक्री दुकानाना परवानगी - beed corona news
बीड, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी या शहरांमध्ये गणेशोत्सवात लागणारे सुशोभिकरणाचे साहित्य विक्री दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट यांना व इतर सर्व प्रकारच्या दुकानांना 23 ऑगस्ट पासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोनाविषयक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बीड लेटेस्ट न्यूज
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिंबधात्मक कायदा 1897 13 मार्च पासून लागू करुन खंड 2,3 व4 मधील तरतुदीनूसार अधिसूचना जारी केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे.