मुंबई: राष्ट्रीय महामार्ग सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील पेंडगाव परिसरातील घोसापुरी जवळ आज (दि 23) पहाटे 2 दोन वाजता अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 1 जण गंभीरित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कारवरील नियंत्रण सुटल्याने काही दिवसांपूर्वीच आंबेजोगाई परिसरातील चनई या ठिकाणी दोन डॉक्टरांचा गाडी झाडावर आदळल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यात पुन्हा अपघात घडला आहे. मित्राच्या लग्नासाठी आलेले चार मित्र नेवासा येथून बीडकडे ( कार क्रमांक MH- 17 BV 9673) येत होते. या कारचा पेंडगाव जवळ घोसापुरी शिवारात प्यासा हॉटेलजवळ अपघात झाला.
जखमींसह मृतांची ही आहेत नावे-धीरज गुणदेजा (वय 30), रोहन वाल्हेकर (वय32), विवेक कानगुने (वय 33) अशी मृतांची नावे आहेत. तर आनंद वाघ (वय 28) अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण नेवासा जिल्हा अहमदनगर येथील रहिवाशी आहेत. सर्वजण बीडला मित्राच्या लग्नासाठी येताना हा अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार तीन-चार पलट्या घेऊन रोडच्या बाजूला गाडी पलटी झाली. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
घटनास्थळी पोलिसांसह पेट्रोलिंग टीमने घेतली धाव:जखमीला बीड जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती समजताच महामार्ग वाहतूक पीएसआय घोडके, रवींद्र नागरगोजे, बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे लक्ष्मण जायभाये, रवी सानप घटनास्थळी पोहोचले. तसेच महामार्ग पेट्रोलिंग टीमचे प्रमुख प्रतीक कदम,सुनील कवडे, राम गायकवाड तसेच महामार्ग रुग्णवाहिका डॉक्टर विशाल डोंगर, यशवंत शिंदे, ड्रायव्हर सुभाष नन्नवरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली आहे.
अपघाताचे बीडमध्ये सत्र-बीडमध्ये जूनमध्ये झालेल्या अपघातातही दोन जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात अहमदपूर अहमदनगर रस्त्यावर झाला होता. मात्र त्यांची ओळख न पडल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान असताना त्यांनी वाहन क्रमांकावरून शोध घेतला होता. विकास पवार व मित्र विजय आव्हाड हे दोघेजण केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ येथे यात्रेनिमित्त आले होते. भरधाव वेगाने वाहने न चालविणे व सीटबेल्टचा वापर करणे, अशा पोलिसांकडून वारंवार सूचना देण्यात येतात.
हेही वाचा-
- Pithoragarh Car accident: मंदिरात जाताना कार थेट दरीत कोसळली, ९ जणांचा मृत्यू
- PMPML bus accident:पीएमपीएमएल बसचा अपघात, मद्यधुंद वाहनचालकाचा कारभार; प्रवाशांना संतोष माने दुर्घटनेची झाली आठवण