आष्टीमृत मावस भावाच्या कुटुंबाचे सांत्वन करून परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. Beed Accident दुचाकीवरून जाणाऱ्या पती- पत्नीला अज्ञात चारचाकीने गितेवाडी फाट्याजवळ जोरदार धडक दिली. शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात पतीचा Beed Accident husband died जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी wife seriously injured आहे. महादेव पाराजी सापते ( वय 37) असे मृताचे नाव आहे.
दुचाकीला जोरदार धडक आष्टी तालुक्यातील खाकाळवाडी येथील महादेव पाराजी सापते यांच्या मावस भावाचे निधन झाले होते. यामुळे महादेव सापते पत्नीबरोबर धामणगाव येथे भावाच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी नातेवाईकांसाठी जेवणाचा डब्बा घेतला होता. Beed Accident husband died नातेवाईकांसोबत जेवण करून रात्री दोघेही दुचाकीवरून गावाकडे परत येत होते. यावेळी कड्यावरून धामणगावकडे भरधाव वेगात जात असलेल्या अज्ञात चारचाकीने गितेवाडी फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आहे.