बीड - सद्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा-कॉलेज, महाविद्यालये बंद आहेत. यातच शेतकऱ्यांची मुले शेतामध्ये आई-वडिलांना मदत करत आहेत. अशाच एका 17 वर्षीय मुलाचा कांद्याचे रोप आणण्यासाठी रिक्षाने जाताना अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शाळा सुरू असती तर, माझा मुलगा वाचला असता, असा टाहो मुलाच्या आई-वडिलांनी फोडला आहे.
ही घटना बीड तालुक्यातील मौजवाडी गावात घडली आहे. 17 वर्षीय नीलेश परमेश्वर बन्सड हा शाळा बंद असल्याने वडिलांना शेती कामात मदत करत होता. त्यातच कांद्याच्या लागवडीसाठी रोपे घेऊन येतो म्हणून मित्राच्या रिक्षात बसून वडवणीकडे जात असताना रस्त्यातच रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात नीलेशचा जागीच मृत्यू झाला.