महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गरीब असल्यानेच मला मॅनेज उमेदवार म्हणून हिणवले जाते - बजरंग सोनवणे - विकास

मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहे. म्हणूनच मला भाजपवाले मॅनेज उमेदवार म्हणून हिणवत आहेत. असे असले तरी आता जनतेनेच बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक हातात घेतली आहे. आम्ही जेव्हा-जेव्हा विकासाचे मुद्दे मांडतो तेव्हा-तेव्हा भाजपकडून भावनिक राजकारण पुढे केले जाते, असा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला.

बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे

By

Published : Apr 4, 2019, 10:50 PM IST

बीड- शेतकरी कुटुंबातील माझ्यासारखा व्यक्ती लोकसभेच्या निवडणुकीत प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात निवडणूक लढव असल्यानेच मला मॅनेज उमेदवार म्हणून जाणीवपूर्वक हिणवले जात आहे. सत्ताधार्‍यांकडे याशिवाय दुसरा कुठलाही विकासाचा मुद्दा नाही, अशी जोरदार टीका बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.

बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे

बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे तर भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात एक दुसऱ्यावर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. बजरंग सोनवणे मॅनेज उमेदवार असल्याची टीका भाजपकडून जाहीर भाषणांमधून केली जात होती. यावर बजरंग सोनवणे म्हणाले, मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहे. म्हणूनच मला भाजपवाले मॅनेज उमेदवार म्हणून हिणवत आहेत. असे असले तरी आता जनतेनेच बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक हातात घेतली आहे. आम्ही जेव्हा-जेव्हा विकासाचे मुद्दे मांडतो तेव्हा-तेव्हा भाजपकडून भावनिक राजकारण पुढे केले जाते, असा आरोपही बजरंग सोनवणे यांनी केला.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत बजरंग सोनवणे यांनी ठिकठिकाणी जाहीर सभांमधून जनतेशी संवाद साधला. बीड लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. एक दुसऱ्यावर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. कधी विकासाच्या मुद्द्यावर तर कधी भावनिक मुद्द्यावर मतदारांना आपल्याकडे खेचण्याची पक्षांत चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details