बीड - 27 वर्षे धावपेटू अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला रौप्य पदक जिंकून दिले आहे. ही वार्ता कळताच त्याच्या जिल्ह्यासह मराठवाड्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. कुटुंबियांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. तर त्याच्या मेहनतीचा चीज झाले असल्याची ( Avinash Sable Wins Silver ) अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी यावेळी दिली आहे.
कुटुंबीयांना वाटला अभिमान -अविनाशच्या कामगिरीचा आनंद कुटुंबियांनी एकमेकांना पेढे भरवून व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यातील मांडवा गावाचा अविनाश साबळे सुरुवातीपासून धावण्याच्या क्रीडा स्पर्धामध्ये आघाडीवर आहे. अविनाश याच्या यशाची बातमी अविनाशने आपल्या आई- वडिलांना दिली आणि त्यांना प्रचंड आनंद झाला होता. अविनाशचे आई आणि वडील हे आपल्या शेतात राहतात.