बीड- धारुर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर आडस रस्त्यावर कार व ऑटो रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाला, तर एक प्रवासी जखमी आहे. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.
धारुर - आडस रोडवर कार-रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षाचालक ठार - धारुर
आडस रस्त्यावर कार व ऑटो रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाला, तर एक प्रवासी जखमी आहे.
![धारुर - आडस रोडवर कार-रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षाचालक ठार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3032508-thumbnail-3x2-auto.jpg)
कार-रिक्षाचा भीषण अपघात
धारूर -आडस रस्त्यावरून जाणाऱ्या कारने (क्र. एमएच 20 सीएल - 9098) धारुरकडे निघालेल्या रिक्षाला (क्र. एमएच 23 - 8819) समोरासमोर धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक मजीद बाबा (50, रा. अंबाजोगाई) हे जागीच ठार झाले. अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रिक्षातील प्रवासी लग्नासाठी धारूरकडे येत होते. अपघातानंतर धारुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.