बीड-लॉकडाऊन दरम्यान नागरिकांनी निडली अॅपमधूनच ऑनलाइन खरेदी तसेच आर्थिक व्यवहार करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाल दिला आहे. संचारबंदी शिथिलतेच्या काळात थेट किराणा दुकानावर जाऊन नागरिक खरेदी करू शकतील. मात्र, नियमांचे पालन करावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
औरंगाबाद खंडपीठाने बीड जिल्हाधिकाऱ्यांचा 'निडली अॅप' सक्तीचा निर्णय केला रद्द
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बीड जिल्हाधिकाऱ्यांचा 'निडली अॅप' सक्तीचा निर्णय रद्द केला आहे. संचारबंदी काळात नियमांचे पालन करत किराणा दुकान राहणार सुरू ठेवावीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
बीडचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शहरी भागात १३ मे पासुन नागरिकांना किराणा दुकानावरुन थेट खरेदी करण्यास मनाई केली होती. ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी निडली अॅपचा वापर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. परंतु,याला व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला सय्यद तौसिफ यासिन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. यावर न्या. रविंद्र घुगे यांच्यासमोर सुनावणी झाली. यात न्यायालयाने संचारबंदी शिथीलतेच्या काळात किराणा दुकाने सुरु राहतील आणि ग्राहक तेथे थेट जाऊन खरेदी करु शकतील असा निर्णय दिला आहे. संचारबंदीचे आदेश नसतील तर तेथे किराणा दुकाने ७ ते २ या काळात सुरु राहू शकतील असेही न्यायालयाने म्हटले आहे.