महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jaljeevan Mission scheme : जलजीवन मिशन योजनेत गैरव्यवहार, तक्रारदार सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला

बीड जिल्ह्यातील जिल्हापरिषद जलजीवन मिशन योजना ( Jaljeevan Mission Scheme ) या अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाबुराव सुर्वे यांच्यावर आज दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ वार शुक्रवार रोजी दुपारी जीवघेणा हल्ला ( Social worker attacked in Beed ) झाला.

Jaljeevan Mission scheme
जलजीवन मिशन योजना

By

Published : Oct 29, 2022, 4:44 PM IST

बीड : बीड जिल्ह्यातील जिल्हापरिषद जलजीवन मिशन योजना ( Jaljeevan Mission Scheme ) या अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाबुराव सुर्वे यांच्यावर आज दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ वार शुक्रवार रोजी दुपारी जीवघेणा हल्ला ( Social worker attacked in Beed ) झाला. सदरील हल्ला जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील लाभार्थी ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हापरिषद बीड विभागातील आधिकारी यांनी ठेकेदार यांच्याशी संगनमताने झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संभाजी बाबुराव सुर्वे यांच्यावर जीवघेणा हल्ला

दबाव आणण्यासाठी हल्ला : जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारदारांवर दबाव आणण्यासाठी हल्ला ( attack on Sambhaji Surve ) केला असून सदरील प्रकरणातील हल्लेखोर तसेच त्यामागील सुत्रधार यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हल्लेखोरांच्या फोनची सीडीआर तपासणी करून कोणाकोणाशी हल्लेखोर संपर्कात होते. याची उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केला आहे. माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांना ईमेलद्वारे तक्रार केली. संबधित प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संगनमताने हल्ल्याचा संशय :उपआयुक्त यांच्या फोनवरून संभाजी सुर्वे ज्युनियर इंजिनिअर ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हापरिषद बीड यांच्या गाडीत बसून पांगरी गावात जातात. त्यांच्यासमोर निखिल चव्हाण यांच्यासह ५-६ हल्लेखोर जीवघेणा हल्ला करतात. पोलीस संरक्षण सोबत का नव्हते, तसेच सरकारी कामात अडथळा म्हणून तक्रार न करणे आदि गोष्टी संशयास्पद असून संबधित प्रकरणात ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हापरिषद बीड विभागातील आधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगनमतानेच हल्ला करून दबाव आणण्याचा प्रयत्न असून संबधित प्रकरणात सखोल चौकशी करण्याची गरज ( Charges against officials and contractor ) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details