बीड -एका महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून नंतर गर्भपातही करण्यास भाग पाडले. व लग्नास नकार दिला या प्रकरणी तरुणाविरोत धात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला.
लग्नाचे अमिष दाखवून पीडितेशी संबंध प्रस्थापित-
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, २४ वर्षिय पीडिता शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत राहते. तिचे लग्न झालेले असून ९ वर्षांचा मुलगा आहे. मात्र पतीने सोडून दिल्यानंतर ती एकटी राहते. तिच्या तक्रारीनुसार मे २०२० मध्ये तिची ओळख ओमकार लावणे (२२ रा. संत नगर, बीड) या तरुणाशी झाली. यातून त्याने लग्नाचे अमिष दाखवून पीडितेशी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो पीडिता व तिच्या मुलाला घेऊन पुण्याला गेला तिथे काही महिने ते लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिले.