बीड : राज्यात नुकतेच ग्रामपंचायत निवडणूकींचे मतदान ( Gram Panchayat Election Voting ) पार पडले. दरम्यान, काल आलेल्या निवडणूकींच्या निकालावरून वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. बीड जिल्ह्यातून सरपंचावर ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून प्राणघातक हल्ला ( Assault on Sarpanch over Gram Panchayat Elections ) झाल्याची घटना घडली आहे.
Beed Crime : ग्रामपंचायत निवडणूकीवरून सरपंचावर प्राणघातक हल्ला; बीडच्या माळापुरीतील घटना - ग्रामपंचायत निवडणूक मतदान
बीडच्या माळापुरी ( Assault on Sarpanch Malapuri in Beed ) येथे नवनिर्वाचित सरपंचावर विरोधी गटाने प्राणघातक हल्ला ( Assault on Sarpanch over Gram Panchayat Elections ) केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सरपंचासह अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. अशोक ढास असे जखमी असलेल्या नवनिर्वाचित सरपंचांचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सरपंचावर प्राणघातक हल्ला : बीडच्या माळापुरी येथे नवनिर्वाचित सरपंचावर विरोधी गटाने प्राणघातक हल्ला ( Assault on Sarpanch Malapuri in Beed ) केला आहे. या हल्ल्यात सरपंचासह अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. अशोक ढास असे जखमी असलेल्या नवनिर्वाचित सरपंचांचे नाव असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन : दरम्यान, ग्रामस्थ बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता तक्रार दाखल न करून घेतल्याने, संतप्त ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.