महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये मदतीसाठी सरसावले आष्टी प्रशासन; गरजू आणि अडकलेल्यांची केली मदत

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी आष्टी तहसील प्रशासनाने काही स्वयंसेवी संस्थांना बरोबर घेऊन नागरिकांना मदत करायला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने मुंबईहून आष्टीत अडकलेल्या एका मुलीची तहसील प्रशासनाने मदत केली असून तिच्या राहाण्याची सोय केली आहे. तर, प्रशासनाकडून टाकळसिंग येथील गोरगरिबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

aashti tehsil beed
आष्टी तहसील प्रशासनाचे अधिकारी

By

Published : Apr 3, 2020, 1:07 PM IST

बीड- लॉकडाऊन दरम्यान गरजूंच्या मदतीसाठी आष्टी प्रशासन सरसावल्याचे दिसून आले आहे. मुंबईहून आष्टीला परीक्षेसाठी आलेली एक मुलगी शहरातच अडकली होती. या मुलीला मानसिक आधार देऊन तिच्या राहण्याची व्यवस्था केली. तसेच शहरातील गरजूंना आम्ही अत्यावश्यक वस्तू पोहोचवण्याची सुविधा करत असल्याचे तहसीलदार शारदा दळवी यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आष्टीत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे, अत्यवाश्यक वस्तू सोडून बाकी सर्व वस्तूंची दुकाने बंद झाली आहेत. काम नसल्याने हातावर पोट असलेल्यांचे खायचे वांदे होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी आष्टी तहसील प्रशासनाने काही स्वयंसेवी संस्थांना बरोबर घेऊन नागरिकांना मदत करायला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने मुंबईहून आष्टीत अडकलेल्या एका मुलीची तहसील प्रशासनाने मदत केली असून तिच्या रहाण्याची सोय केली आहे. तर, प्रशासनाकडून टाकळसिंग येथील गोरगरीबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा-कोरोनाचा परिणाम, लॉकडाऊनमुळे भटक्या जनावरांवर उपासमारीची वेळ

ABOUT THE AUTHOR

...view details