परळी वैजनाथ -राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता मंत्री धनंजय मुंडे यांनी शहरातील प्रभाग क्र.३ मधील नगर परिषदेच्या जागेत बौद्ध धम्म केंद्र विकसित करण्यासाठी १५ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी, तसेच मतदारसंघातील बर्दापूर (ता. अंबाजोगाई) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक उभारणीसाठी १ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागामार्फत मंजूर केला आहे.
दरम्यान निधिची तरतूद केल्याने, परळीच्या शासकीय विश्रामगृहात धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड, प्रा. डॉ. विनोद जगतकर, माधव ताटे, सोपान ताटे, महादेव रोडे, अनंत इंगळे, महेंद्र रोडे, नितीन रोडे, भैयासाहेब आदोडे, आबासाहेब आदोडे, विजय कुमार गडले, पंडीत झिंजुर्डे यांची उपस्थिती होती.