अंबाजोगाई - सुदंर माझे कार्यालय या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील आपेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 हा आकर्षक बनला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दवाखान्यास रंगरंगोटी करण्यात आली आहे. यामुळे सर्वांचे लक्ष या दवाखान्याकडे वेधले जात आहे.
आपेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना बनला हायटेक! - beed Apegaon veterinary hospital news
कार्यालयाचा परिसर स्वच्छ राहून काम करण्याठी प्रसन्न वातावरण असावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार यांनी कार्यालय सुंदर करण्यासाठी कार्यालय प्रमुखांना आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यालयप्रमुखाने हे काम लोकसहभागातून करावे असे निर्देश दिले आहेत.
कार्यालयाचा परिसर स्वच्छ राहून काम करण्याठी प्रसन्न वातावरण असावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार यांनी कार्यालय सुंदर करण्यासाठी कार्यालय प्रमुखांना आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यालयप्रमुखाने हे काम लोकसहभागातून करावे असे निर्देश दिले आहेत. आपेगाव येथील पशुवैधकीय अधिकारी डॉ. बी. एस. कोकणे यांनी आपल्या संकल्पनेतून दवाखान्यास रंगरोगटी करून घेतली आहे. दर्शनी भिंतीवर पशुंची काळजी घेण्यासंदर्भात सुविचार लिहिले आहेत. कार्यालय स्थापनेपासून प्रथमच कार्यालय आकर्षक बनल्याने नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.
हेही वाचा - हार्दिक, विराटपाठोपाठ टीम इंडियाचा अजून एक खेळाडू झाला 'बाबा'