महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Caught Taking Bribe : एकाच दिवशी 4 जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात - Anti corruption department arrested Fore people

बीडमध्ये एका दिवसात 4 जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ( Anti corruption department ) जाळ्यात अडकले आहेत. वनविभागातील 3 जण ( 3 persons caught while accepting bribe ) तर एका सपंचाच्या ( Sapancha son caught taking bribe ) मुलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

Caught Taking Bribe
Caught Taking Bribe

By

Published : Dec 28, 2022, 6:15 PM IST

बीड -आपल्या स्वतःच्या आईची सही घेण्यासाठी, ग्रामसेवकाला त्यातील वाटा देण्यासाठी 20 हजाराची लाच मागणाऱ्या सरपंच ( Sapancha son caught taking bribe ) पुत्राला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ( Anti corruption department ) रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मनरेगा अंतर्गत विहीर कुशल कामगाराच्या अनुदानाच्या धनादेशावर स्वाक्षरी घेण्यासाठी पैशाची मागणी केली होती. त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

20 हजाराची मागीतली लाच -एसीबीच्या माहितीनुसार सुधाकर नंदू उगलमुगले वय 34 रा. नारेवाडी ता. केज असे आरोपीचे नाव असून त्याची आई सरपंच आहे. तक्रारदार यांच्या मुलाच्या नावे मनरेगा अंतर्गत जलसिंचन विहीर मंजूर झाली होती. यावेळी कुशल कामाच्या अनुदानासाठी आलेल्या धनादेशावर आरोपी सुधाकर याने त्याच्या सरपंच आई श्रीमती आशाबाई नंदु उगलमुगले यांची सही घेण्यासाठी, तसेच ग्रामसेवक यांना त्यातील वाटा देण्यासाठी शासकीय पंच समक्ष 20 हजाराची मागणी केली होती. याबाबत 21 सप्टेंबर 2022 रोजी एसीपीचे अधिकाऱ्यांनी पडताळणी केली होती. त्यानंतर या प्रकरणात 28 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाहीची पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बीडच्या वन खात्यातील लाचखोर एसीबीच्या जाळ्यात -स्वाॅमिलमधील लाकडी मशीनचा परवाना नूतन करून कार्यवाही न करण्यासाठी 50 हजार रुपयाची लाज घेताना बीडच्या वनविभागातील 2 वनरक्षक 1 चालकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही केली आहे. वनविभागातील हे एसीबीच्या जाळ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जालना एसीबीने ही कारवाई केली आहे, या प्रकरणात एसीबीच्या टीमने तिघांना ताब्यात घेतले असून एक फरार असल्याचे समजते.

लाचप्रकरणी तिघांना बेड्या - बीड मधील स्वाॅमिल धारकाकडे वनविभागातील तिघांनी प्रत्येकी 5 हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती 2 हजार रुपये देण्याचे ठरविले होते. सर्व स्वाॅमिल धारकाकडून प्रत्येकी 2 हजार प्रमाणे 50 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष असलेल्या तक्रारदाराने औरंगाबाद लाचलुजपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. पडताळणी नंतर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जालना येथील एसीबीच्या टीमने सापळा लावून कुर्ला रोडवरील एका स्वाॅमिलच्या ठिकाणी या तिघांना बेड्या ठोकल्या. वनरक्षक जाधव, चालक भालेराव, वनरक्षक शेख अकबर यांना 50 हजार रुपयाची लाज घेताना एसीबीने पकडले. तर तक्रारदाराने नाव दिलेल्या पैकी एक कर्मचारी फरार असल्याचे समजते. एसीबीच्या टीमने तिघांना ताब्यात घेतले असून दुपारी उशिरापर्यंत बीड येथील एसीबी कार्यालयात कार्यवाही सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details