बीड - आष्टी तालुक्यातील केरूळ येथील एका 65 वर्षीय महिलेचा शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यूनंतर तीन तास अंत्यविधीसाठी कोणीच मृतदेहाकडे फिरकले नाही. अखेर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह नगरपंचायत कार्यालयासमोर आणला. मृतदेहावर नगर पंचायत प्रशासन व आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे वेळीच अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यानंतर नगर पंचायत प्रशासन खडबडून जागे झाले, अखेर प्रशासनाकडून रात्री महिलेच्या मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यात आले.
रुग्णालय प्रशासनाने ६ नोव्हेंबर रोजीमहिलेची अॅटीजन चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. मृतदेहावर अत्यंविधी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने नगरपंचायत प्रशासनाला कळविले. नातेवाईकांसह रुग्णालय प्रशासन मृतदह घेऊन आष्टी शहरातील पिंपळेश्वर स्मशानभूमीकडे सांयकाळी सहाच्या दरम्यान गेले; परंतु येथे नगरपंचायतचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नव्हता. फक्त अत्यंविधीसाठी सरपण आणून टाकले होते. यानंतर नातेवाईक आणि डॉक्टर सुमारे तीन तास तेथे थांबले, मात्र नगरपंचायतचे कोणीही इकडे फिरकेल नाही. यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृतदेह नगरपंचायतच्या गेटवर आणला. या प्रकाराने प्रशासन खडबडून जागे झाले, पोलीस प्रशासनाचीही पळापळ झाली. प्रशासनाने रात्री उशिरा मृतदेहावर अत्यंसंस्कार केले.
बीड : संतप्त नातेवाईकांनी कोरोनाबाधिताचा मृतदेह आणला नगर पंचायतीसमोर - beed latest news
मृतदेहावर नगर पंचायत प्रशासन व आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे वेळीच अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत, त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृतदेह नगरपंचायत कार्यालय समोर आणला.
आम्हाला निरोप आला नाही-
नगरपंचायतीने सर्व व्यवस्था केली होती. ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी दरवेळी नगरपंचायतीकडे बोट दाखवतात. आमच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यविधीसाठीची सर्व व्यवस्था केली होती. ग्रामीण रुग्णालयातून निरोप आला असता, तर आम्ही कर्मचाऱ्यांना अंत्यविधीसाठी पाठवले असते, अशी प्रतिक्रिया आष्टी नगर पंचायातचे मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिली आहेे.
नगरपंचायतीला पत्र दिले होते-
कोरोनाबाधीत महिलेच्या मृतदेहावर अंत्यविधीसाठी नगरपंचायतीला पत्र दिले होते. त्यांनी व्यवस्था केली होती. पण तिथे कर्मचारी नसल्याने नातेवाईक संतप्त झाले. यामुळे त्यांनी मृतदेह नगरपंचायत कार्यालयासमोर आणला, अशी प्रतिक्रिया आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे यांनी दिली आहे.