बीड: बीड येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीत एकाने मध्यरात्री आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र पोलीस तपासामध्ये या व्यक्तीचे नाव भरत सर्जेराव पाळवदे (Bharat Sarjerao Palvde) वय 40 जिल्हा परिषद कर्मचारी असून रा. सासुरा ता. केज असे या मयत आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना कळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा पंचनामा केला. (An employee committed suicide by hanging himself)
Suicide : बीड जिल्हा परिषदेच्या इमारती समोर कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या - employee committed suicide by hanging himself
बीडच्या जिल्हा परिषद नवीन इमारतीत एका इसमाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. मात्र, ही हत्या की आत्महत्या हे अद्याप समजू शकले नाही. मात्र ज्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे तो जिल्हा परिषदेचा आज कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. (An employee committed suicide by hanging himself)
![Suicide : बीड जिल्हा परिषदेच्या इमारती समोर कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या An employee committed suicide](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17128092-926-17128092-1670319106780.jpg)
हत्या की आत्महत्या :त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ही आत्महत्या की हत्या हे गुड कायम असल्याने अद्यापही पोलीस प्रशासनाच्या शोध कार्यात ही घटना कशी घडली हे अजून अस्पष्ट आहे. जिल्हा परिषदेत अशी एखादी घटना घडू शकते. याकडे कोणाचेच लक्ष जाऊ शकत नाही यावरून जिल्हा परिषद वरील सिक्युरिटी वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मात्र या घटनेनंतर नागरिकांत वेगवेगळ्या तर्क वितरकांना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र हत्या की आत्महत्या याचा शोध शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करत आहेत.