बीड -देशातील ओबीसी समाजाला विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी भाजप सरकारने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. खरं तर आम्हीच ओबीसीला संवैधानिक अधिकार प्राप्त करून दिला आहे. असे प्रतिपादन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी विजयादशमीनिमित्त आयोजित मेळाव्यात भगवान भक्ती गडावर केले. दरम्यान याच कार्यक्रमात मुंडे भक्तांनी 'पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा' म्हणत सीएम....सीएम च्या घोषणा दिल्या.
अमित शाह म्हणाले, भगवानबाबांच्या दर्शनासाठी आलोय. एका सुंदर स्मारकाची निर्मिती केली आहे. भगवानबाबांचे आयुष्य सामाजिक सुधारणांसाठी, वंचितांच्या शिक्षण, सन्मान आणि संघर्षासाठी होते. शिक्षणातूनच ओबीसींचे कल्याण होईल हा संदेश त्यांनी दिला. गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या मार्गावर चालून वंचितांना न्याय दिला. आज पंकजा त्याच मार्गावर चालत आहेत. राज्यभरात भगवान बाबांचे भक्त पसरले आहेत. दरम्यान, मोदींचे समर्थन करण्यासाठी हा जमाव इथे जमला आहे. मोदींनी कलम ३७० हटवून देशाला एक केले आहे. तो संदेश घेऊन तुम्ही गावागावात जा. आमचे सरकार भगवानबाबांच्या विचारांवर चालत आहे. आम्ही ओबीसी समाजाला संवैधानिक दर्जा दिला आहे. ओबीसींच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आतापर्यंत हे का केले नाही, याचा जाब त्यांना विचारला पाहिजे. बहुजन आणि ओबीसींच्या हितासाठी आम्ही काम करत आहोत. असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा -शेवटी व्हायचं तेच झालं! भाजप-सेना युती तुटली? आता आमने-सामने लढाई