महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 24, 2019, 12:55 PM IST

Updated : Oct 24, 2019, 2:18 PM IST

ETV Bharat / state

'भावनिक राजकारणाला परळीच्या जनतेने लाथाडले'

माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, हा विजय तर विकासाच्या बाजूने आहे. भावनिक राजकारणाला परळीच्या जनतेने लाथाडले आहे. अखेर परळीच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे.

धनंजय मुंडे

बीड -परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे 30768 मतांनी विजयी झाले आहेत. तर, 90418 मते मिळवून पंकजा मुंडे पराभूत झाल्या आहेत.

तराव्या फेरीअखेरच 21000 मतांची आघाडी घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र परिसरात फटाके उडवून जल्लोष साजरा करायला सुरवात केली होती. दरम्यान, माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, हा विजय तर विकासाच्या बाजूने आहे. भावनिक राजकारणाला परळीच्या जनतेने लाथाडले आहे. अखेर परळीच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे.

वादग्रस्त परळी मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो. मात्र इथेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना जबरदस्त हादरा दिला आहे. मुंडे पुढे म्हणाले, "गुलाल आमचाच हे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. आज अखेर परळीत आम्हीच बाजी मारत आहोत" परळी विधानसभा मतदारसंघात एकूण पंचवीस फेऱ्या आहेत. अजून एक लाखाहून अधिक मतमोजणी शिल्लक आहे.

Last Updated : Oct 24, 2019, 2:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details