महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अण्णासाहेबांनंतर आम्हीच मराठा आरक्षणाचा लढा दिला - आमदार विनायक मेटे - शैक्षणिक व आर्थिक प्रगती

राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा आरक्षणाबाबतचा प्रश्न पाठवण्याचा आग्रह शिवसंग्राम या पक्षाने केला होता. यानंतर अनेकांनी शिवसंग्राम पक्षावर टीका केली होती. गेली 35 वर्ष मराठा आरक्षणाच्या संदर्भात आम्ही चिकाटीने संघर्ष केला. पुढच्या पिढीसाठी शैक्षणिक व नोकरीमध्ये मराठा समाजातील मुलांना संधी मिळवून दिली.

बीड येथे पत्रकार परिषदेत बोलताना आमदार विनायक मेटे.

By

Published : Jun 29, 2019, 11:23 PM IST

बीड- अण्णासाहेब पाटील यांनी सर्वात प्रथम मराठा आरक्षणाची मागणी करत मोर्चा काढला होता. यामुळे मराठा समाजात जागृती झाली. अण्णासाहेब पाटील यांच्या नंतर आरक्षणाबाबतची चळवळ थोडी शांत झाली होती. मात्र आम्ही 1987 पासून मराठा महासंघाच्या माध्यमातून पुन्हा नव्याने मराठा आरक्षणाचा लढा व संघर्ष सुरू केला होता. आज त्याचेच फलित म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. याबद्दल आम्ही समाधानी आहोत, असे मत आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री मराठ्यांचे सोयरे-

यावेळी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना मेटे म्हणाले की, शाहू महाराजांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला न्याय दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने मराठा समाजाचे सोयरे आहेत, असेही ते म्हणाले. येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत आमदार विनायक मेटे बोलत होते

बीड येथे पत्रकार परिषदेत बोलताना आमदार विनायक मेटे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा आरक्षणाबाबतचा प्रश्न पाठवण्याचा आग्रह शिवसंग्राम या पक्षाने केला होता. यानंतर अनेकांनी शिवसंग्राम पक्षावर टीका केली होती. गेली 35 वर्ष मराठा आरक्षणाच्या संदर्भात आम्ही चिकाटीने संघर्ष केला. पुढच्या पिढीसाठी शैक्षणिक व नोकरीमध्ये मराठा समाजातील मुलांना संधी मिळवून दिली. असे सांगत मेटे यांनी 1999 पासूनच्या आरक्षणासंदर्भातील विविध पक्षांची भूमिका विशद केली. आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी मराठा समाजाला कसा धोका दिला, याचाही कित्ता गिरवला.

खऱ्या अर्थाने सोय करून देणारे म्हणजे सोयरे असतात. मराठा समाजाला आरक्षण देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीची सोय करून दिली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचे सोयरे आहेत, अशा शब्दात मेटे यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, सुभाष सपकाळ, सुदर्शन धांडे, अनिल घुमरे आदींची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details