परळी :बीडमध्येही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळे परळी वैजनाथ येथे सकाळी ०७ ते सायंकाळी ०७ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्याची मुभा आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करून सायंकाळी ०७ वाजेनंतर दुकाने चालू ठेवणाऱ्या दुकानदारांवर आज परळीत प्रशासनाने कारवाई केली. मंगळवारी सायंकाळी नायब तहसीलदार रूपनर यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
कोरोना नियमांचे उल्लंघन -
बीड जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी काही नियम लागू केले आहेत. नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांच्या विरूध्द फौजदारी कारवाई करण्याची तरतूद जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात आहे. पण, दुकानदार वारंवार प्रासनाने सूचना देऊनसुध्दा नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून येत आहे. ही बाब लक्षात घेता मंगळवारी प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली होती.
हेही वाचा -मुंबई पोलीस दलात एकाच दिवशी ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या, गुन्हे शाखेतील तब्बल ६५ जणांचा समावेश