बीड:वाळू माफियांची दादागिरी सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे.जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून वाळू माफियांचा नंगानाच जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. याच दरम्यान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी एक वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाची तपासणी करण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु चक्क त्यांच्याच गाडीला हायवाने कट मारला. चालकांने पुढे जाऊन चक्क वाळू रस्त्याच्या मधोमध ओतल्याने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे तो हायवा पकडु शकल्या नाही. मात्र त्यांच्या बॉडीगार्डने त्या हायवाचा पाठलाग करून तो पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु चालक फरार झाला.
60 वाळू वाहतूक पकडले: अवघ्या काही तासातच पोलीस प्रशासनाने तो वाळू वाहतूक करणारा हायवा व चालक प्रकाश कोकरेला पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा चालक राहणार बाग पिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड येथे राहतो. तर त्याचवेळी रस्त्यावर असणारी विना नंबरचे जवळपास 60 वाळू वाहतूक करणारे हायवा महसूल व पोलीस प्रशासनाने पकडले आहे. तसचे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
महसूल प्रशासनाकडून कारवाई : एलसीबी कडून टिप्पर चालकाला बेड्या ठोकण्यात आल्यात. मात्र यातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे. गेवराई आणि माजलगाव तालुक्यात सर्वाधिक वाळू उपसा होतो. यावर महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई केवळ तात्पुरत्या स्वरूपात असते. जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्यापासूनच वाळू माफीया त्यांच्या निशाणावर आहेत. अशातच या घटनेमुळे प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आता वाळू माफियांनी जिल्हाधिकाऱ्यांनावर लक्ष दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दंडात्मक कारवाई: याआधीही परळी वैजनाथ बीड येथील उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे व तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी, शहरातील जलालपूर रस्ता व तोतला मैदानावर असलेल्या गौण खनिजाच्या पाच ट्रॅक्टरवर कारवाई केली होती. यात ट्रॅक्टर ताब्यात घेऊन 6 लाख 94 हजार 740 रुपये दंडात्मक कारवाई केली होती.
हेही वाचा -
- अवैध वाळू वाहतूकप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल 20 लाख 80 हजारांच्या मुद्देमाल जप्त
- परभणीत अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने ताब्यात 32 लाखाचा मुद्देमाल जप्त
- बीड अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई